पुस्तकप्रेमींसाठी एक खुषखबर आहे . ब्रिटीश काउन्सीलच्या मुंबई शाखेने पुस्तकांचा सेल आयोजीत केला आहे.
सुरेख बांधणीची , कला ते शास्त्र अशा वेगवेगळ्या प्रांताची हजारो पुस्तके विक्रीस उपलब्ध आहेत.
ही सर्व पुस्तके आयात (इंपोर्टेड) केलेली आहेत. उद्याम्हणजे ४ फेब्रुवारी पासून हा सेल सुरु होतो आहे.
शेवटची तारीख आहे १० फेब्रुवारी २०१७. (रविवार ५ फेब्रुवारी वगळून)
सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर हा सेल चालू असेल.
ब्रिटीश काउन्सील ९०१ नववा मजला, टॉवर -१ इंडीयाबुल सेंटर , ८४१ , सेनापती बापट मार्ग , एलफिन्स्टन रोड (प) .
लहान मुलांसाठी काही खास पुस्तके या सेल मध्ये तुम्हाला मिळतील जी इतरत्र कुठेही मिळणार नाहीत .
सुरक्षेच्या कारणास्तव कॅरीबॅग नेण्याची अनुमती नाही हे लक्षात ठेवून फक्त पैशाचे पाकीट घेऊन जा. क्रेडीट्/डेबीट कार्डांचे अर्थातच स्वागत आहे.
शेवटी एक महत्वाची खबर , या पुस्तकांची किमान किंमत फक्त ३० रुपये आहे.
