श्श !! सकाळच्या थोड्याश्या गोंधळानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला राष्ट्रीय अर्थसंकल्प आज संसदेसमोर मांडला.
गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पाची लाईनदोरी पुढे ओढणारा, कोणतेही आश्चर्याचे धक्के न देणारा ,शेतकर्यांना पाच वर्षात दुप्पट उत्पन्न आश्वासीत करणारा , ग्रामीण भागातील जनतेला , ग्रामीण युवकांना प्रोत्साहीत करणारा अर्थसंकल्प हाच आजच्या अर्थसंकल्पाचा आश्चर्याचा मुद्दा होता. अगदीच काही दिले नाही असे म्हणायला नको म्हणून वार्षीक ५००००० उत्पन्न असणार्या नोकरदारांना आयकरात ५ टक्क्याची सूट अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. थोडक्यात, गेल्या वर्षी ज्यांनी २५००० आयकर भरला असेल, त्यांना या वर्षी १२५०० आयकर भरावा लागेल . म्हणजे जर तुमचे उत्पन्न ५००००० च्या गटात असेल, तर या वर्षभरात तुमच्या घरी महिना १००० रुपये जास्त येणार आहेत. चला, तर आपण बघू या १२५०० चे काय करता येईल?
आज पेट्रोलचा दर ७७ रुपयाच्या आसपास आहे म्हणजे जेमतेम 162 लिटरचा खर्च भागेल.
किंवा एक चांगला -रेड मी नोट-३ किंवा सॅमसंग गॅलॅक्सी -७ मोबाईल घेता येईल.
अथवा
चार जीन्स आणि एखादा चांगला शर्ट घेता येईल
किंवा चार जणांच्या कुटुंबाला एक सिनेमा बघता येईल.
कदाचीत, एका मुलाच्या शाळेची फी भरता येईल.
चैन म्हणून, आठवड्यातून एकदा डोमीनोजचा लार्ज पिझ्झा खाता येईल.
सत्कारणी लावावं म्हटलं तर, उपयुक्त खर्च म्हणून मुंबई ते ठाणे प्रथम दर्जाचा वर्षभराचा पास काढता येईल,योजनाबद्ध खर्च म्हणून, कुटुंबाचा आरोग्य विमा करता येईल, किंवा दोन लाखाच्या पॉलीसीचा हप्ता भरता येईल ,
आणि शेवटी, पुढच्या वर्षी ५००००० उत्पन्नाला शून्य कर असावा या साठी एक दणदणीत सत्य नारायणाची पूजा घालता येईल
तुम्ही काय करणार ?
