काही दिवसांपूर्वी फ्रीडम २५१नावाचा स्मार्टफोन फक्त २५१रूपयात बाजारात आला होता. जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून बराच गाजावाजा करत आलेला हा स्मार्टफोन आपल्या आश्वासनांना खरा उतरला नाही. आता असाच एक 4G स्मार्टफोन फक्त ५०१रुपयांत उपलब्ध झालाय. सद्या जर तुम्ही नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर हा मिडरेंज किंमतीचा 4G स्मार्टफोन तुम्ही फक्त 501 रुपयात घेऊ शकता.
'चॅम्पवन' नावाच्या मोबाईल कंपनीने ग्राहकांना हा फ्लॅशसेल उपलब्ध करून दिलाय. यानुसार मुळात ८०००रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन फक्त ५०१रुपयांत तुमचा होऊ शकतो. या फोनमध्ये एका मध्यम प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये असणारी सगळी वैशिष्टे आहेत.
8 MP चा रिअर आणि 5 MP फ्रंट कॅमेरा असणाऱ्या हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप वर्जन 5.1 वर चालतो. 5 इंच HD डिस्प्ले, 2 GB रॅम, 16 GB इंटर्नल स्टोअरेज आणि फिंगरप्रिंट स्कॅनर अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला हा स्मार्टफोन तुम्ही खालील वेबसाईट वरून स्वतःच्या जबाबदारीवर अॉनलाईन अॉर्डर करू शकता..
आर्डर करण्यासाठी वेबसाईट - https://champonec1.com/
आणि हो.. अॉर्डर करण्याधी एकदा वेबसाईट वरील माहिती जरूर वाचा.
