व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये आता करा लोकांना टॅग

व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये आता करा लोकांना टॅग

तुम्ही किती व्हॉट्सऍप ग्रुप्समध्ये आहात? ग्रुप मध्ये गप्पा मारत असताना तुम्हाला कधी कधी कोण कुणाला उत्तर देतंय असा प्रश्न पडतो का? व्हॉट्सऍपने नव्या अपडेटमध्ये यावरच एक उपाय आपल्याला दिला आहे. ट्विटर, फेसबुक वर जसे आपण लोकांना टॅग करतो तसे आता व्हॉट्सऍप ग्रुप चॅट मध्ये पण करता येणार आहे.

ही पद्धत वापरण्यासाठी तुमच्याकडे व्हॉट्सऍचं नवीन व्हर्जन हवं. एखाद्या ग्रुप मध्ये बोलत असताना @ टाकून पहा. त्या ग्रुप मधल्या सर्व सदस्यांची नाव येतील. ज्याला मेसेज पाठवायचा त्याचं नाव सिलेक्ट करा. झाला तो टॅग. आहे ना सोपं?