तुम्ही २५१ रुपयांच्या फ्रीडम 251 फोन बद्दल ऐकले असेलच. पण आता त्याहून स्वस्त म्हणजे ९९ रुपयांत एक फोन आला आहे. हा फोन आणणाऱ्या कंपनीचे नाव आहे ‘नमोटेल’ आणि या हँडसेट मॉडेल चे नाव आहे ‘अच्छे दिन’. हो, मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या कारकीर्दीनंतर अच्छे दिन आले आहेत आणि तेही 99 रुपयात
या कंपनीचे प्रवर्तक माधव रेड्डी या फोनबद्दल माहिती देताना म्हणतात या फोनमध्ये 4 इंच डिस्प्ले, 1.3 GHz चे प्रोसेसर आणि 1 जी बी ची रॅम आहे. त्यांच्यानुसार हा फोन 17 ते 25 मे दरम्यान ऑनलाइन बुकिंगसाठी उपलब्ध असेल.
काही महिन्यापूर्वी आलेल्या फ्रीडम 251 प्रमाणेच हा फोनसुद्धा मेक इन इंडिया प्रोग्रॅमच्या अंतर्गत असल्याचा दावा करत आहे. या फोनच्या वेबसाईटवर मूळ किंमत 2999 असून आता ती कमी करून 99 रुपये करण्यात आली आहे.
हा फोन जरी कॅश ऑन डिलिव्हरीने उपलब्ध असला तरी फ्रीडम 251 चा अनुभव पाहता, अजून एक-दोन दिवस तुम्ही अजून माहिती मिळण्याची वाट पहावी.
