बाबा सहगल परत आलाय ’रिहाना’सोबत..

लिस्टिकल
बाबा सहगल परत आलाय ’रिहाना’सोबत..

भारताचा रॅपस्टार ’बाबा सहगल’ खूप वर्षांनी नवीन गाणी  घेऊन आलाय. त्यातलं”रिहाना’ हे गाणं हे खास त्याच्या पठडीतलं. त्याचे बोल ऐकले तर खुदकन हसू फुटल्याखेरीज राहायचं नाही. पाठोपाठ ’डायटिंग कर ले’ आणि ’चुरा के दिल मेरा कोरिया चली’ हे ही आलंय.  

नव्वदीच्या दशकात त्याच्या  ’ठंडा ठंडा पानी’ आणि ’दिलरूबा’ या कॅसेटसनी धुमाकूळ घातला होता. आजच्या त्याच्या ’रिहाना’प्रीत्यर्थ पाहूयात त्याची खूप गाजलेली काही गाणी!!

ठंडा ठंडा पानी

बाबाचं लोकांनी डोक्यावर घेतलेलं कदाचित हे पहिलंच गाणं. ’Ice Ice Baby'ची भारतीय आवृत्तीच म्हणा ना. हा खरंतर एक आल्बमच होता. ’दिल धडके बाबा दिल धडके, कोई नहीं जाने मेरा दिल धडके’ हे गाणंही भलतंच पॉप्युलर झालं होतं. 

डॉ. धिंग्रा-मंजुला

डॉ. धिंग्रा या आल्बममधलं ’मंजुला’ हे गाणं तेव्हा खूप गाजलं होतं. दुर्दैवाने त्याचा व्हिडिओ आज जालावर उपलब्ध नाहीय.

आजा मेरी गाडी में बैठ जा

मिस ४२० हा साधारण १९९४ मध्ये आलेला सिनेमा. सिनेमा चालला नाही पण बाबा सहगलची गाणी मात्र खूप गाजली.  त्यातली  ’मेमसाब, गोरा चेहरा काला तील’ आणि ’आजा मेरी गाडी में बैठ जा’ ही गाणी विशेष उल्लेखनीय. 

मैं भी मॅडोना

’आगे आगे लडकी पीछे मैं भी हूं सयाना’ म्हणणारा आणि या गाण्यात आचरट चाळे करणारा बाबा पाहून आता हसू येईल पण त्या काळात तो एकदम वेगळा प्रकार होता.

रिहाना

'रिहाना ओ रिहाना, पोलिस स्टेशन इज थाना.

वहॉंपे जनरल स्टोर है, यहॉं पे है किराना’

अशा खास शब्दांसह आलेलं हे रिहाना गाणं किमान एकदा ऐकायलाच हवं.