जय महाराष्ट्र !!! १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र सरकारने या निमित्त एक पदक (मेडल) प्रसारीत केले. महाराष्ट्रातल्या घरोघरी असावे असे हे पदक तांबे आणि निकेलच्या मिश्रधातूपासून (क्युप्रोनिकेल) बनवले आहे. हे असे पदक अस्तित्वात आहे याची माहितीच बर्याच मराठी माणसांना नाही. ठाणे येथील नाणी संग्राहक प्रशांत ठोसर यांच्या संग्रहातील या मेडलचे हे छायाचित्र. ebay वर हे पदक खूपच स्वस्तात सहज मिळत आहे. अरे ! बघता काय ? विकत घ्या हे मानचिन्ह !
