आंदोलनाचे आपण आजवर अनेक प्रकार पाहिले आहेत पण या व्हिडिओ मध्ये आपल्याला कधीच न पाहिलेल्या प्रकारचे आंदोलन पाहायला मिळणार आहे. बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी मार्केटजवळचे रस्ते अनेक महिन्यांपासून खराब आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही PWD च्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पावलं उचलली नाहीत. त्यावर वैतागलेल्या नागरिकांनी चक्क ऑफिसात जाऊन नागीण डान्स करून आंदोलन साजरे केले. या आंदोलनाचा फायदा होतो का नाही, ते वेळच ठरवेल. पण आज मात्र हा व्हिडिओ व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळवत आहे.
