तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेट्स वाहनांवर तर पाहिल्या असतीलच. कधी वाटलंय का तुम्हांला की पांढर्यावरती काळ्या रंगातल्या अक्षराचीच नंबरप्लेट का? आणि लोक जसे आकड्यांचे खेळ करून कधी दादा तर कधी बापूची नंबरप्लेट बनवतात, तसे लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या रंगावर दुसर्याच कुठल्यातरी रंगात लिहिलेले आकडे का दिसत नाहीत? कारण आहे आपल्या देशाचे कायदे.
भारत सरकारनं प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी बॅकग्राऊंड आणि आकडे या दोन्हीचा रंग ठरवून दिलाय आणि त्यात बदल करायची कुणालाच परवानगी नाहीय. चला तर मग आज जाणून घेऊ कोणती नंबरप्लेट कुणासाठी असते ते..