१५९० रुपयांवर १ करोडची लॉटरी...बँक ग्राहकाची बल्ले बल्ले !!

१५९० रुपयांवर १ करोडची लॉटरी...बँक ग्राहकाची बल्ले बल्ले !!

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडियाच्या एका ग्राहकाला मोदी कॅशलेस स्कीमचा जबरदस्त फायदा झाला आहे. डिजिटल माध्यमातून केलेल्या १५९० रुपयांच्या व्यवहाराला लकी ड्रॉ योजने अंतर्गत तब्बल एक करोड रुपयांचं बक्षीस या ग्राहकाला मिळालं आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लकी ड्रॉ काढून निवडलेल्या ६ विजेत्यांमध्ये या ग्राहकाचं नाव होतं. ‘डिजिटल पेमेंट प्रमोशन स्किम’ च्या लकी ड्रॉ चा हा १०० वा ड्रॉ होता.

सरकारने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी 25 डिसेंबर, 2016 पासून ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी ‘लकी ग्राहक योजना’ आणि ‘डीजी धन व्यापार योजना’ सुरु केल्या आहेत.

लकी ड्रॉ जिंकलेल्या ग्राहकांच्या यादीतील पहिला ग्राहक सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचा असून त्याला एक करोड मिळणार आहे, दुसऱ्या क्रमांकावर  बँक ऑफ बड़ौदाचा ग्राहक आहे ज्याला ५० लाख रुपये रोख मिळतील, तिसऱ्या ग्राहकला २५ लाख रुपये जाहीर झाले असून तो पंजाब नॅशनल बँकचा ग्राहक आहे. 

हि योजना ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ द्वारा राबवण्यात येत आहे. १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विजेत्यांचा नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर मध्ये सत्कार होणार आहे.

तर वाचकहो तुम्हीही डिजिटल व्यवहाराकडे वळा कुणास ठाऊक करोडपती बनण्याचा पुढचा नंबर तुमचा असेल !!!