या माणसाला आहेत ३५० गर्लफ्रेंड्स...वाचा कोण आहे हा !!!

या माणसाला आहेत ३५० गर्लफ्रेंड्स...वाचा कोण आहे हा !!!

तुम्ही ‘लेडीज vs रिक्की बहल’ सिनेमा बघितला आहे का ? तसाच काहीसा प्रकार इथे घडला आहे. फोटोत दिसणारा माणूस आहे 'के वेंकट रत्न रेड्डी'. या माणसाने आत्ता पर्यंत ३५० गर्लफ्रेंड बनवल्या आहेत. जणू मुली पटवण्यात पीएचडी केली आहे याने.

काय ? विश्वास नाही बसत ? मग ऐका....

वेंकट रेड्डीचा सरळ सरळ कारभार म्हणजे लग्नासाठी इच्छुक मुलींना फसवणे. हा मॅट्रिमोनियल साईट वरून मुलीना संपर्क करायचा. मग भेटीगाठी, गोड गोड बोलणं. मोठ मोठाल्या बाता मारणं आणि त्यानंतर वेळ साधून हा महाभाग त्या मुलींचे पैसे आणि किमती समान घेऊन पळून जायचा. एवढंच नाही मोठा हात मारण्यासाठी काही मुलींशी त्याने लग्नेही केली.

पण चोराची चोरी एक दिवस पकडलीच जाते. त्याने नेहमी प्रमाणे एका अमेरिकन मुलीवर आपलं जाळं टाकलं. या मुलीशीही तो मॅट्रिमोनियल साईटवरच भेटला होता. दोघांच लग्न ठरलं. लग्न करण्यासाठी तो अमेरिकेतही जाऊन पोहोचला. लग्न होऊन वीस दिवस झाल्यानंतर महत्वाच्या कामासाठी मुलीच्या घरच्यांकडून त्याने ३० हजार डॉलर (जवळ जवळ २० लाख रुपये) मागितले. पैसे मिळाल्यानंतर तो तिथून नेहमीप्रमाणे फरार झाला.

वेंकट या कामात पारंगत असला तरी यावेळी नशिबाने त्याची साथ दिली नाही. मुलीने हैद्राबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली असता काही दिवसातच पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. पोलिसांनी केलेल्या चौकशी मध्ये त्याने आपल्या कामाचा सर्व खुलासा केला. 

अमेरिकन मुली नंतर तो कॅनडाच्या एका मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता पण त्या आधीच पोलिसांनी त्याची वरात काढली