सप्टेंबरच्या १ तारखेपासूब बदललले नियम वाचून घ्या , शेवटी पैशाचा प्रश्न आहे हा !

लिस्टिकल
सप्टेंबरच्या १ तारखेपासूब बदललले नियम वाचून घ्या , शेवटी पैशाचा प्रश्न आहे हा !

१ सप्टेंबरपासून बदलले आहेत आधार-पीएफ, जीएसटी, एलपीजी, चेक क्लिअरन्सबाबतचे हे नियम!!

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात. या बदलांचा परिणाम आपल्या दैनंदिन दिनक्रमावर देखील होतो. या महिन्यापासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून आधार-पीएफ, जीएसटी, एलपीजी, चेक क्लिअरन्ससह अनेक नियम बदलत आहेत. या नियमांचा आपल्या दैनंदिन जीवनावर तसेच खिशावर थेट परिणाम होणार आहे. १ सप्टेंबरपासून कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेऊया-

PF UAN सह आधार लिंक करणे आवश्यक

PF UAN सह आधार लिंक करणे आवश्यक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएफ खात्याला आधार क्रमांकासह पीएफ खाते आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) ला जोडणं अनिवार्य केलं आहे. हे लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. म्हणजेच जर तुम्ही काल मंगळवारपर्यंत आपल्या पीएफ खात्यात युनिवर्सल अकाउंट नंबर (यूएएन) नंबरशी लिंक केलं नसेल, तर मात्र तुमच्या खात्यात कंपनीच्या वतीनं पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. PF UAN आणि आधार लिंक करण्यासाठी देण्यात आलेली तारीख यापूर्वीच दोन वेळा वाढवण्यात आली होती.

GST R-1 दाखल करण्यासाठी नवे नियम

GST R-1 दाखल करण्यासाठी नवे नियम

ज्या व्यवसायांनी गेल्या दोन महिन्यांत जीएसटीआर -3 बी रिटर्न दाखल केले नाही त्यांना १ सप्टेंबरपासून GSTR-1 मधील बाह्य पुरवठ्याचा तपशील भरता येणार नाही. GSTN म्हणते की केंद्रीय GST नियमांतर्गत नियम -59 (6) हा १ सप्टेंबर 2021 पासून लागू होईल. हा नियम GSTR-1 दाखल करताना निर्बंधांची तरतूद करतो. जे व्यवसाय त्रैमासिक रिटर्न भरतात, जर त्यांनी मागील कर कालावधीत फॉर्म GSTR-3B मध्ये रिटर्न दाखल केले नसेल, तर त्यांना GSTR-1 भरण्यासही प्रतिबंध केला जाईल.

एलपीजी गॅस किंमती वाढल्या

एलपीजी गॅस किंमती वाढल्या

गॅस सिलेंडरची किंमत वाढली नाही असा एकही महिना गेला नाही. १ सप्टेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. १४.२ किलो विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत रुपये २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती सिलेंडर ६८ रुपयांनी महाग झाले होते. या वर्षी आतापर्यंत एलपीजी सिलिंडर १९०.५० रुपयांनी महाग झाले आहे.
 

पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात घट

पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात घट

पंजाब नॅशनल बँकेनं एक सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक २.९% व्याजदर देण्यात येणार आहे. बँकेच्या सर्व नवीन आणि जुन्या खातेधारकांना हा नियम लागू असणार आहे.

शेअर बाजारात मार्जिनचे नवीन नियम

शेअर बाजारात मार्जिनचे नवीन नियम

शेअर बाजारातील ट्रेडिंगची पद्धत या महिन्यापासून बदलली आहे. आता १००% मार्जिनचे नियम पूर्णपणे अंमलात आले आहेत. पूर्ण मार्जिन रोख आणि FNO मध्ये भरावे लागेल. १००% अग्रिम मार्जिन द्यावे लागेल, म्हणजेच पूर्ण मार्जिन रोख आणि FNO दोन्हीवर भरावे लागेल. एवढेच नाही तर इंट्राडेमध्ये सुद्धा पूर्ण मार्जिन द्यावे लागेल. कोणत्याही वेळी मार्जिन कमी झाल्यास दंड आकारला जाईल.

ॲक्सिस बँक चेक क्लीयरन्स

ॲक्सिस बँक चेक क्लीयरन्स

भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२० मध्ये धनादेश मंजुरीसाठी नवीन सकारात्मक वेतन प्रणाली अधिसूचित केली होती. ती १ जानेवारी २०२१ पासून लागू झाली आहे. अनेक बँकांनी आधीच ही प्रणाली लागू केली होती. परंतु ॲक्सिस बँक १ सप्टेंबर २०२१ पासून त्याची अंमलबजावणी करत आहे. बँक एसएमएसद्वारे आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देत ​​आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टीम वेतन प्रणाली

पॉझिटिव्ह पे सिस्टीम वेतन प्रणाली

सुरक्षित वाटणाऱ्या चेक व्यवहारातही अनेक घोटाळे होतात. अनेक ग्राहक या फसवणुकीला बळी पडत आहेत. अशाच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) १ जानेवारी २०२१ पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम ('सकारात्मक वेतन प्रणाली') लागू केलीआहे. खोट्या चेकद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केले होते. ऍक्सिस बँक १ सप्टेंबर पासून हे लागू करत आहे.

यांसह घडणाऱ्या इतर बदलांची माहितीही आम्ही तुम्हांस देत असतो. एक सजग नागरिक म्हणून प्रत्येकाला अशा बदलांची आणि नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. हा लेख तुम्हीही वाचा आणि इतरांनाही वाचायला द्या..