भारतातल्या इंग्रजी सत्तेच्या खुणा अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत, खास करून मुंबईमधून. जसं मुंबईचं बॉम्बे झालं, बांद्राचे बँड्रा आणि मुंबईमध्ये असूनही फक्त राणीच्या सत्तेमुळं स्टेशनचं नाव विक्टोरिया टर्मिनस. आता विक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी टर्मिनस झालं असलं तरी अजूनही काही स्थानकांची नावं ब्रिटीश काळाची साक्ष देतात. कोणती म्हणून काय विचारता ? रे रोड, करी रोड, कॉटन ग्रीन, एल्फिन्स्टन रोड, चर्नी रोड...आणि हो, आपला सॅंडहर्स्ट रोड.. नाही का?
तर आता या इंग्रज प्रभावाला मिटवण्यासाठी शिवसेनेनं ८ लोकल स्थानकांची नवी नांवं गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवली आहेत. सध्या फक्त एलफिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यास गृहमंत्रालयानं मंजुरी दिलीय.राहिलेल्या स्थानकांची नांवंही लवकरच बदलण्यात येतील.
चला तर बघूया कोणकोणत्या स्टेशनचं नाव बदललंय आहे आणि त्यांचे नवं नांव काय आहे ते...








