कालच्या कोर्टाच्या निर्णयाने वाहन कंपन्या हवालदिल झालेत पण या निर्णयाने ज्यांचे दुचाकी किंवा चारचाकी घेण्याचं स्वप्न होतं त्यांचे मात्र अच्छे दिन आले आहेत असचं म्हणव लागेल. अचानकपणे गाड्यांवर तब्बल १० ते २० हजार पर्यंतची सूट बघून ग्राहक सुद्धा चक्रावून गेलेत. अनेकांना कळत नाहीये हे नेमकं चाल्लय तरी काय ?
नक्की भानगड काय आहे ते आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो...ऐका....
पर्यावर प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय घेत BS III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे. १ एप्रिल पासून BS-IV इंजिन असलेल्या गाड्यांनाच परवानगी मिळणार आहे. आता या निर्णयाचा फटका बसल्यानंतर कंपन्यांनी ३१ मार्चच्या आत BS-III इंजिनच्या गाड्या विकण्यासाठी घसघशीत सूट देऊन गाड्या खपवण्याचा चंग बांधला आहे. आज म्हणजे ३१ मार्च हा अखेरचा दिवस असणार आहे.
आता हे BS III आणि BS IV प्रकरण काय आहे ?
सांगतो !!!

BS म्हणजे ‘भारत स्टँडर्ड स्टेज’. इंजिनमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारने दिलेले मानक म्हणजे BS. हे मानक भारतातील प्रत्येक वाहनाला लागू होते. प्रदूषणावर रोख लावण्यासाठी सरकार वेळोवेळी हे मानक बदलत असते. BS IV हे याच मानकाचा भाग असून यापुढे BS IV असलेले इंजिनंच भारतात वापरता येणार आहे.
कोणत्या गाडीवर किती सूट ?

ड्रीम युगा – १४००० रु. सूट
लियो – १४००० रु. सूट
अॅक्टिव्हा – ११००० रु. सूट
शाईन – १०००० रु. सूट
सीबीआर – २०००० रु. सूट
सीबीआर १५० – २०००० रु. सूट
ड्यूएट, माईस्ट्रो एज, आणि प्लेजर – १२५०० रु. सूट
एचेएफ डिलक्स सिरीज – ५००० रु. सूट
ग्ल्यॅमर, एकस्प्रो, आय स्मार्ट 100 – ७५०० रु. सूट
स्प्लेंडर प्लस – ५००० रु. सूट
एवढ्या मोठ्या आकड्याचा डिस्काउंट आहे पण जरा घाई करा आज शेवटचा दिवस आहे.
मग वाट कसली बघताय....लवकर पळा लेको.....
