चोरी करताना CCTV ला चकवण्याचा सॉलीड उपाय; करून पाहू नका बरं..

चोरी करताना CCTV ला चकवण्याचा सॉलीड उपाय; करून पाहू नका बरं..

आजकाल सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेले असतात. त्यांच्यामुळे चोरांना पकडणं सोपं जातं. पण म्हणून मग चीनमधल्या  या चोराने पकडलं जाऊ नये म्हणून CCTVलाच चकवण्याची एक शक्कल शोधून काढली. 

याने केलं काय, एक बर्‍यापैकी लांबरूंद पांढरं कापड घेतलं आणि ते एका बाजूने छत्रीला लावलं. तसेही CCTV कॅमेरे वरच्या बाजूला असतात. त्यामुळे छत्रीमुळे चेहरा झाकला गेला. आणि बाकीची  माहिती उदाहरणार्थ कपडे, उंची वगैरे कळू नये म्हणून छत्रीला लावलेल्या कापडाचा वापर केला. आहे की की नाही धमाल आयडिया!!

एवढं करून त्याने चोरलं काय? तर सिगारेटची पाकिटं!! धन्य आहे या चोरबुवांची.