मंडळी, भारताच्या सीमेवर चीन घुसखोरी करतोय अशा बातम्या अधूनमधून वाचायला मिळत असतात. या दोन्ही देशांचं आपापसात पटत नाही असंच यातून दिसतं. पण हल्लीच आलेल्या एका बातमीने हे साफ खोटं ठरवलंय भाऊ.
मंडळी, चीन आणि भारत संबंध राजकीय स्तरावर बिघडलेले असले तरी दोन्ही देशातील लोक मात्र आपापसात शांततेने नांदत आहेत. आता हेच बघा ना, यावर्षी कोलकाता मध्ये होणार्या दुर्गा पूजेचा सर्व खर्च चीन उचलणार आहे. चीनने चक्क भारतीय सणाला आपली ‘स्पॉन्सरशीप’ देऊ केली आहे.... आहे की नाही अनोखी बातमी ?
![]()
कोलकाता मधल्या ‘सॉल्ट लेक’ भागात होणारी दुर्गापूजा यावर्षी चीनी पद्धतीच्या सजावटीने उजळून निघणार आहे. यासाठी भारतीय कलाकारांना चिनी केलंचं प्रशिक्षण दिलं जाईल. फक्त सजावट नाही तर अनेक चीनी सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुर्गा पुजेची शान वाढणार आहे. चीनी आणि भारतीय परंपरेचा हा मिलाफ असेल !!
राव अशीच शांतता जर सीमेवर पाहायला मिळाली तर ‘हिंदी चीनी भाई भाई’ हे खऱ्या अर्थाने साकार होईल....नाही का ?
