पतंजली सिमच्या बातमीने केला सगळ्यांचा पोपट !! वाचा खरी बातमी काय आहे ते !!

पतंजली सिमच्या बातमीने केला सगळ्यांचा पोपट !! वाचा खरी बातमी काय आहे ते !!

मंडळी काल पतंजलीच्या नव्या सिमकार्डची बातमी आली आणि सोशल मिडीयावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पडला. ही बातमी खरी आहे असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. अनेक बड्या वृत्तवाहिन्या या बातमीला सतत दाखवत होत्या. पण एकाच दिवसात सर्वांचा पोपट झाला राव, कारण पतंजलीच्या सिमकार्डची बातमी खोटी होती. राव तुम्ही बरोबर ऐकलंत.....ती बातमी खोटी होती...

मग खरं काय आहे ?

पतंजली बीएसएनएल सोबत मिळून टेलिकॉम क्षेत्रात उडी घेणार हे कालचं वृत्त होतं. खरं तर पतंजलीने बीएसएनएल सोबत हातमिळवणी केली आहे पण फक्त आपल्या कर्मचाऱ्यांसाठी. पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना स्वस्तात मोबाईल सेवा वापरता यावी म्हणून पतंजलीने ही सुविधा तयार केली आहे. पतंजली योग समिती, महिला प्रकोष्ठ, युवा भारत, पतंजली स्वदेशी समृद्धी कार्डधारक आणि पतंजली किसान सेवा या संघटनांशी जोडलेल्या व्यक्तींनाच या सेवा दिल्या जातील.

मंडळी, काल ज्या ऑफर्स आपल्याला दिसत होत्या त्या फक्त पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. याबद्दल स्वतः पतंजलीने परिपत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. पतंजली टेलिकॉम क्षेत्रात उतरत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राव, पतंजलीच्या सिमकार्डची बातमी खोटी असली तरी नेटकऱ्यांचा एक दिवस धम्माल मिम्समुळे मस्त गेला.