सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी कोण व्हायरल होईल याचा नेम राहिला नाही. दर काही दिवसांनी कोणाच्या खिजगणतीतही नसलेली व्यक्ती व्हायरल होते. गेल्यावर्षी टिकटॉकवर एक अवघ्या १३ वर्षांची मुलगी व्हायरल झाली होती. ही पोरगी पण काही साधीसुधी व्हायरल झाली नव्हती. पूर्ण जगाचे लक्ष तिने वेधून घेतले होते.
अमेरिकेत डोरीटोज नावाची पेप्सीकोची उप-कंपनी आहे. भारतातही यांचे नचोज आवडीने खाल्ले जातात. ही कंपनी फ्लेवर्ड चिप्स बनवते. १९६४ पासून ही कंपनी चिप्स बनवते. मात्र त्यांच्या ५० वर्षांच्या कालावधीत जी प्रसिद्धी झाली नाही ती एका १३ वर्षांच्या मुलीने एका टिकटॉक व्हिडीओतून त्यांना मिळवून दिली होती.
रायली स्टुअर्ट नावाची ही ऑस्ट्रेलियन मुलगी टिकटॉकवर व्हिडिओ बनवून टाकत असे. एके दिवशी तिला या चिप्सच्या पॉकिटात तिला एक वेगळा चिप सापडला. तो चिप्स तीन बाजूंनी फुललेला होते. रायलीने मग या चिप्सच्या तुकड्याला आपल्या व्हिडिओत जागा दिली आणि व्हिडिओ गेला टिकटॉकवर.
आता जे कुणालाही अपेक्षित नव्हते ते घडले. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. तब्बल ४० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. राहिला प्रश्न पडला की हे चिप्स इतका महत्वाचा, तर हा खावा की नको? मग तिने हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना विचारला. त्यांनी मग वेगवेगळी उत्तरे दिली.
काहींनी सांगितले की हे चिप्स म्युझियममध्ये ठेवा, तर काहींनी हे काहींनी याचा थेट लिलाव करण्याचा सल्ला दिला. रायलीबाईंना लिलाव करण्याची आयडिया आवडली. तिने इबे या वेबसाईटवर त्या चिप्सची किंमत १ डॉलरपेक्षा पण कमी ठेवली. ती तर हे चिप्स लिलावात टाकून मोकळी झाली. पण लिलाव जसा वाढला ते बघून तिला धक्काच बसला.
वाढत वाढत या चिप्सची किंमत तब्बल ७७ लाखांवर जाऊन पोहोचली. जेव्हा हीच किंमत फक्त ७७ हजार झाली होती, तेव्हाच रायली आणि तिच्या कुटुंबाला काय करू नी काय नको करू असे झाले होते. आता तर बंपर धमाका झाला होता. पण या मुद्द्याभोवती जे वादळ उठले ते बघून हा लिलाव वेबसाईटवरून हटवण्यात आला.
मग काय रायलीला काहीच मिळाले नाही का? तर मिळाले. रायलीला खुद्द डोरीटोज कंपनीने जवळपास दीड लाख रुपये दिले. त्यांचे म्हणणे पडले की रायलीच्या या बिझनेस डोक्यालिटीमुळे आम्ही इम्प्रेश झाले आहोत. काहीही असो, पण कुठली गोष्ट नशीब चमकवून जाईल काही सांगता येत नाही हे आजच्या जमान्यात ठळकपणे समोर येत आहे.
उदय पाटील
