विविध देशाच्या नोटा आणि नाणी जमवणे हा आता पोरखेळ राहीलेला नाही.नाणी संग्राहकांची मोठी यशस्वी बाजार पेठ आता भारतात विकसीत झालेली आहे. या विकासात आंतरजालाचे योगदान फार मोठे आहे.नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे जुनी ऐतिहासीक संग्राह्य नाणी विकत घेऊन त्यात गुंतवणूक करणे. या पर्यायात अनभिज्ञ गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात जाण्याची शक्यता असते. नविन संग्राहकाला -गुंतवणूकादाराला दुसरा पर्याय आहे भारतीय टांकसाळी तर्फे वितरीत करण्यात येणार्या कमोमोरेटीव्ह कॉइन्स मध्ये गुंतवणूक करणे. छोट्या गुंतवणूकीतून मोठा फायदा कमावण्याची ही सुवर्णसंधी आहे.
अशी नाणी इंडीया मिंट (भारतीय टांकसाळ) तर्फे वारंवार वितरीत केली जातात. या नाण्यांचे दोन संच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक : यु.एन.सी म्हणजे अनसर्क्युलेटेड कॉइन्स आणि दोन : प्रूफ कॉइन्स.
या पैकी एक किंवा दोन्ही संचात केलेली गुंतवणूक दिर्घकालीन नफा मिळवून देते.उदाहरणार्थ २००३ साली वितरीत झालेले राणा प्रतापांच्या नाण्याचा संच नुकताच अकरा हजारात विकला गेला.
सध्या उपलब्ध असलेली संधी आहे .अलाहाबाद हायकोर्टाच्या १५० व्या वर्षानिमित्त येणारा तीन नाण्यांचा संच .युएन्सी आणि प्रूफ अशा दोन्ही संचात ही नाणी उपलब्ध आहेत. गुंतवणूक चार हजाराची आहे. येत्या काही वर्षात हा संच फायदा मिळवून देईल यात शंका नाही.
समजा ,या नाण्यात तुम्हाला गुंतवणूक कराविशी वाटत नसेल तर टांकसाळीच्या सेल्स काउंटर वर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या नाण्याचा संच उपलब्ध आहे .
बाकी सर्व माहिती या दुव्यावर उपलब्ध आहे
