शनिवार स्पेशल : २०१७ गाजवणाऱ्या १० वादग्रस्त घटना!!

लिस्टिकल
शनिवार स्पेशल : २०१७ गाजवणाऱ्या १० वादग्रस्त घटना!!

१७ आता संपत आलेला आहे. थोड्याच दिवसात शेवटचा आठवडा सुरु होईल. या संपत आलेल्या वर्षाकडे बघून वाटतं की २०१७ हे वर्ष बऱ्याच कारणांनी वादग्रस्त ठरलं. त्याला अनेक करणं होती. एक वाद मिटला नाही की दुसरा वाद सुरु झाला. काहीच दिवसापूर्वी शांत झालेला पद्मावतीचाच वाद घ्या ना. अनेक वादांमुळे हा सिनेमा रिलीज झाला नाही. ही तर आत्ताची गोष्ट झाली पण वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक वाद गाजले. आजच्या आपला विषय हाच आहे. 

मंडळी आज आपण बघणार आहोत २०१७ मध्ये घडलेल्या ९ वाद्ग्रस्त घटना :

१. प्रियांका चोप्रा आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून झालेला वाद.

१. प्रियांका चोप्रा आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून झालेला वाद.

प्रियांका चोप्रा आणि नरेंद्र मोदी यांची बर्लिनमध्ये भेट झाली. या भेटीचा फोटो सोशल मिडीयावर आला आणि नवीन वाद सुरु झाला. या भेटीत प्रियांका अशीच का बसली आहेे? तिचे पाय उघडे दिसत आहेत, पंतप्रधानांसमोर ती अशी का बसली आहे? तिने कपडे असे का घातलेत? किंबहुना, अंगभर कपडे का घतले नाहीयेत? वगैरे वगैरे चर्चांना उधाण आलं. काही संस्कारी लोकांनी तर तिला सल्ले देखील दिले.

२. स्नॅपचॅटचा वाद

२. स्नॅपचॅटचा वाद

हा एक राष्ट्रीय वाद होता मंडळी. स्नॅपचॅटचे मालक ‘इवान स्पिगल’ यांनी "स्नॅपचॅट हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे, भारत आणि स्पेन सारख्या गरिब देशात मला ते वाढवण्याची इच्छा नाही." असं म्हटलं आणि संपूर्ण देशात नवा वाद सुरु झाला. यावेळी #UninstallSnapchat ही हॅशटॅग वापरून स्नॅपचॅट अनइंस्टॉल करण्याची मोहीम नेटकऱ्यांनी हाती घेतली. काही दिवसातच स्नॅपचॅटला अनेकांनी १ स्टार दिला. पण एवढा वाद होऊन शेवटी माणसं त्याला विसरूनही गेली आहेत.

३. सोनू निगमचा 'अजान' वरून सुरु झालेला वाद

३. सोनू निगमचा 'अजान' वरून सुरु झालेला वाद

मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सोनू निगमने ट्विटरवर आपलं मत मांडलं. पण अर्थात ते ट्विट वादग्रस्त असल्यानं अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. हा वाद एवढा वाढला की सोनू निगमच्या विरोधात पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काऊन्सिलचे उपाध्यक्ष ‘सय्यद शाह आतेफ अली कादरी’ यांनी फतवा काढला, की जो कुणी सोनू निगमचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालेल त्या व्यक्तीला आपण 10 लाख रुपयांचे बक्षीस देऊ!!

४. लिपस्टिक अंडर माय बुरखा

४. लिपस्टिक अंडर माय बुरखा

नेहमीप्रमाणे आपल्या संस्कारी सेन्सॉर बोर्डने या काहीशा बोल्ड फिल्मवर असंस्कारी असल्याचा शिक्का लावला. महिलांच्या आयुष्यावर बेतलेली ही फिल्म समाजाचा बुरखा फाडायचं काम करते. हे चित्रण आपल्या संस्कारी बोर्डला पटण्यासारखंच नव्हतं. अनेक महिने रखाडल्यानंतर शेवटी २१ जुलै रोजी हा सिनेमा रिलीज झाला.
 

५. ऑस्ट्रेलियाच्या जाहिरातीतील गणपती बाप्पा

५. ऑस्ट्रेलियाच्या जाहिरातीतील गणपती बाप्पा

'Meat and Livestock' या मांस विकणाऱ्या कंपनीने 'मेंढीचं मांस' विकण्यासाठी एक जाहिरात बनवली. जाहिरातीत जगातील सर्वच प्रमुख देव दाखवले होते. यात भारताचं प्रतिनिधित्व करत होते आपले गणपती बाप्पा. आता या देवांची पंगत भरली आहे, मेंढीचं मांस खाण्यासाठी आणि त्यात गणपती बाप्पा सामील आहेत म्हटल्यावर वाद तर होणारच. ऑस्ट्रेलियातील हिंदू समुदायाने यावर आक्षेप घेतला पण कंपनीने आपली बाजू धरून ठेवली. भारतात देखील याचे पडसाद उमटले.

६. AIB ने नरेंद्र मोदींना ट्रोल केल्यानंतर तयार झालेला वाद

६. AIB ने नरेंद्र मोदींना ट्रोल केल्यानंतर तयार झालेला वाद

AIB वाले नेहमीच कारनामे करत असतात. यावर्षी त्यांनी नरेंद्र मोदींनाच ट्रोल केलं. नरेंद्र मोदी यांच्या सारख्या दिसणाऱ्या माणसाचा फोटो घेऊन त्यांनी मोदींचा मीम तयार केला. यात मोदींच्या फोटोला ‘डॉग फिल्टर’ लावला होता.  त्यामुळे माणसांची सटकली. यानंतर नवा वाद निर्माण झाला. शेवटी AIB वाल्यांना माफी मागावी लागली. माफी मागतानाही त्यांनी आपला उर्मटपणा सोडला नाही.
 

७. जॉली एल. एल. बी. २ आणि खरे वकील

७. जॉली एल. एल. बी. २ आणि खरे वकील

एक हलका फुलका कॉमेडी टच असलेल्या ‘जॉली एल. एल. बी. २’च्या कथानाकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नव्हती.  पण वाद निर्माण झालाच. वाद असा की, खऱ्या वकिलांना वाटू लागलं की जॉली एल. एल. बी. मधून त्यांच्या वकीली व्यवसायाची खिल्ली उडवली जात आहे. यावरून जॉली एल. एल. बी. च्या नावातून एल. एल. बी. आणि काही दृश्य काढून टाकण्याची मागणी झाली. शेवटी काही दृश्यांना कात्री लावल्यानंतर सिनेमा रिलीज झाला.अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं भाऊ?
 

८. झायरा वसीमच्या रोलमुळे झालेली ‘दंगल’

८. झायरा वसीमच्या रोलमुळे झालेली ‘दंगल’

दंगल सिनेमात झायरा वसीम या नवोदित अभिनेत्रीने गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यात तिला मुलांबरोबर कुस्ती करावी लागली. तिला हा रोल मस्त जमून आला होता, पण काही लोकांना हे रुचलं नाही. ती मुळची काश्मिरी. त्यामुळे जहाल मतांच्या एका गटाकडून तिला धमक्या येऊ लागल्या. तिने शेवटी फेसबुकवर पोस्ट टाकून जाहीर माफी मागितली.
 

९. एस. दुर्गा आणि न्यूडचा वाद

९. एस. दुर्गा आणि न्यूडचा वाद

एस. दुर्गा आणि न्यूड या मराठी सिनेमांना ‘इफ्फी’ (IFFI) या गोवाफिल्म फेस्टिवलमध्ये ओपनिंग फिल्म होण्याचा मान मिळाला होता. मराठी सिनेमासाठी तर हा बहुमान होताच. कारण इफ्फीमध्ये ओपनिंग फिल्म असणारी न्यूड ही पहिली मराठी फिल्म होती. पण या दोन्ही सिनेमांमधल्या बोल्ड विषयांमुळे त्यांचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. सेन्सॉर बोर्डच्याही आधी एका फिल्म फेस्टिवलमधून फिल्मला त्याच्या बोल्ड विषयामुळे काढून टाकण्याची ही बहुदा ही पहिलीच वेळ असावी. 

१०. पद्मावतीचा वाद

१०. पद्मावतीचा वाद

अल्लाउद्दिन खिलजीच्या तावडीत सापडू नये म्हणून स्वतःला जोहारच्या अग्नीत झोकून देणारी पद्मावती भव्य दिव्य पडद्यावर दिसणार ही बातमी आली आणि अनेकांना त्याचा ‘बाजीराव मस्तानी’ तर होणार नाही ना अशी शंका येऊ लागली. सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानीच्या मूळ इतिहासालाच धक्का लावला होता. असाच प्रकार पद्मावतीच्या बाबतीत होणार का,  असा प्रश्न पडलेला असतानाच राजपूत करणी सेनेला बातमी मिळाली की पद्मावती सिनेमात काही आक्षेपार्ह दृश्यं दाखवण्यात येणार आहेत. यातूनच करणी सेनेने आणि आणखी काही राजपूत सेनांनी मिळून पद्मावतीला कडकडून विरोध केला. अनेक अडचणी नंतर या सिनेमाचा रिलीज थांबवण्यात आला आहे.

 

मंडळी, शेवटी काय तर, झाले गेले वाद विसरून आपण २०१८ ची चांगली सुरुवात करूया. काय म्हणता ?