वडापावच्या लिस्ट नंतर आम्ही घेऊन आलो आहोत समस्त पुणेकरांची जान आणि शान असलेला मिसळपाव. ढॅण्टॅढण !!!
ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अश्या सर्व प्रमुख शहरांमध्ये मिसळ मिळते. त्या त्या भागातल्या चवीनुसार ती भन्नाटच लागते पण मिसळ खावी तर पुण्याचीच. काही वर्षांपुर्वी असं बोललं जात होतं की नाशिक मध्ये मिसळपावच्या सर्वात जास्त व्हरायटी चाखायला मिळतात. पुणेकरांनी मक्तेदारी जाते की काय असं वाटू लागलेलं पण पुण्याने आपला मिसळचा गड अजूनही राखला आहे.
मंडळी पुण्यात सर्वात चांगली मिसळ कुठे मिळते हे पुणेकरांनाच शिकवण्याचा शहाणपणा आम्ही करणार नाही. पण जे बाहेरून पुण्यात येतात, जे मुंबईकर ‘वडापाव’ला घेऊन मिरवतात त्यांच्यासाठी आम्ही आज खास घेऊन आलो आहोत ‘पुण्यातली मिसळपावसाठी प्रसिद्ध असलेली २० ठिकाणं.’ एकदा खाऊन तरी बघा मग बाकी सगळं विसराल राव. विषय भाऊ !!














