सध्या नविन आलेल्या ट्रॅफिक नियमांमुळे सगळीकडे खळबळ उडालेली आहे. दंडाची रक्कम बघितली तर सामान्य माणसाला धडकी भरेल एवढी प्रचंड आहे. समाजमाध्यमात या विषयावर दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय आधी रस्ते सुधारा मग एवढा भरमसाठ दर आकारा, तर दुसरा गट म्हणतो दोन्ही विभाग वेगळे आहेत. दंडाची रक्कम प्रचंड असल्याशिवाय वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही.
मंडळी, या सर्व गदारोळात वाढलेल्या दंडाच्या रकमेची टिंगल सुरू झाली आहे. अनेकांनी गेल्या 2-3 दिवसात अनेक जोक्स, मिम्स व्हायरल केले. पण आता या नविन नियमांचा तडाका अनेकांना बसायला सुरुवात झाली आहे. नुकताच गुरगावमध्ये असाच एक भन्नाट किस्सा घडला आहे.


