मंडळी, फेसबुकवर दिलेल्या हाकेने काय नाही होऊ शकत? दोन महिन्यांपूर्वी एरिया-५१ वर धाड टाकण्यासाठी एकाने फेसबुक इव्हेंट बनवला होता. लाखो लोकांनी भाग घेण्याची तयारी दाखवली. धाड कशी घालायची याची तयारी पण लोक करू लागले होते. नंतर समजलं की इव्हेंट बनवणाऱ्याने ‘मस्करी’ केली होती.
तर, या फेसबुक इव्हेंट प्रकाराने जगातल्या सगळ्यात मोठ्या फर्निचर कंपनीची डोकेदुखी वाढवली आहे. आणि हे आत्ताचं नाहीये बरं. साधारण ३ वर्षापासून हे सुरु आहे.








