इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाने घोळ घातला असला तरी दुसरीकडे मात्र फुटबॉलमधील मोठी स्पर्धा युरोपियन चॅम्पियन्स लीगमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नुकतेच या सामन्यात एक आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळाली. डेन्मार्कचे खेळाडू आपल्या मोबाईलवर सतत फिनलँडच्या सामन्याचे स्कोर तपासत होते. हे असे का झाले ते जाणून घेण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया.
सलग २ पराभव पचवलेल्या डेन्मार्क संघासाठी कालचा दिवस सुखद होता. त्यांनी ४४ मिनिटांच्या अंतरामध्ये थेट ४ गोल मारत ४-१ अशा फरकाने रशियाला पराभूत केले. आता शनिवारी डेन्मार्कचा पुढचा सामना हा वेल्ससोबत होणार आहे. हा विजय डेन्मार्कसाठी खूप महत्त्वाचा आहे. तब्बल १७ वर्षांनी डेन्मार्कने युरो कपच्या टॉप १६ मध्ये धडक दिली आहे. रशिया मात्र या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे.

