गाडीला डेन्ट आलाय? घरच्याघरी काढा..

गाडीला डेन्ट आलाय? घरच्याघरी काढा..

कारची कितीही काळजी घेतली तरी कधी ना कधी ती वेळ येतेच, आणि आपणच ती कुठंतरी ठोकतो किंवा कुणीतरी येणारा-जाणारा तिला छानपैकी घासून जातो. 

तर आज बोभाटा घेऊन आलेय, घरच्याघरी हा गाडीचा पोचा कसा काढायचा याची कृती. गंमत म्हणजे यासाठी लागणारं सगळं सामान आपल्या घरी नेहमीच असतं. तर, पहिल्यांदा एक-दीड लिटर पाणी एकदी खळखळून उकळी येईल इतकं तापवा. ज्या भांड्यात हे पाणी उकळणार आहात, त्याला स्वत:चा दांडा असेल तर उत्तमच. मग हे गरम पाणी जिथला पोचा काढायचाय, त्यावर हळूहळू ओता. हेतू हा की, गाडीचा तिथला पत्रा चांगला गरम झाला पाहिजे. हे झालं, की डेन्ट आलेल्या ठिकाणी आतून एक-दोन हलकेसे ठोके मारा. गरम झालेला पत्रा आपोआप मूळ स्थितीला येईल. आता पोचा आल्यावर गाडी तशीच फिरवायला नको की गॅरेजमध्ये टाकायलाही नको. 

फक्त गरम पाणी आणि गरम पत्रा काळजीपूर्वक हाताळा बरं का!!