भुताखेतांवर विश्वास न ठेवणार्या आणि अशा पछाडलेल्या ठिकाणी जाऊन रात्र-रात्र मुक्काम ठोकणार्या गौरव तिवारींचा ७ जुलै रोजी गूढ मृत्यू झालाय. भानगढ किल्ला असो वा प्रेतागार, ते तिथे रात्रभर मुक्काम ठोकून तिथं भुतं कशी नाहीत हे लोकांना पटवून द्यायचे. अशा विचित्र कामामुळे त्यांना कित्येकदा रात्रीच घराबाहेर राहावे लागत असे. त्यांच्या वेबसाईटवर म्हटल्याप्रमाणे तिवारींनी ६०००हून अधिक भुताळी ठिकाणांचा बंदोबस्त केला आहे.
त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीला काही निगेटिव्ह शक्ती त्यांना खेचत असल्याचं जाणवत आहे असं म्हटलं होतं. सध्यातरी पोलिसांना ही आत्महत्येची केस वाटत असली तरी कुटुंबियांना तसं वाटत नाहीय. आदल्या रात्री दिल्लीतल्या एका भुताळी घरात जाऊन आलेले गौरव तिवारी ७ तारखेला ११च्या सुमारास लॅपटॉपवर काम करताकरता अचानक बाथरूममध्ये गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येच खरं काय ते कळू शकेल. अवघ्या बत्तीसाव्या वर्षी मरण पावलेल्या गौरव तिवारींच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
