फोटो काढताना smile please म्हणण्याची सगळ्यांना सवय असते . कुठल्याही फोटोत चेहरा हसरा असेल तर तो फोटो सुंदर येतो. परंतु काही फोटो असेही काढावे लागतात, ज्यामध्ये हसणे अजिबात मान्य नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल असा कोणता फोटो आहे? आम्ही बोलत आहोत पासपोर्ट फोटोबद्दल! आजकाल पासपोर्टच्या फोटोमध्ये हसायचे नाही असा नियमच आहे. हा विचित्र नियम का बरं बनवला असेल ? याचे खरे कारण समजून घेऊयात.
खरंतर काही वर्षांपूर्वीपर्यंत असा नियम नव्हता. तेव्हा चष्मा घातलेला किंवा हेअरस्टाईल केलेला, हसणारा चेहऱ्याचा फोटो पासपोर्टवर चालत असे. मात्र अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर अनेक नियम कडक झाले. त्यामुळे हे नियम सर्व देशात लागू झाले. सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. तसेच फोटोंमध्येही बदल झाले.
न हसणारा फोटो असण्याचे मुख्य कारण आहे विमानतळावर वापरले जाणारे बायोमेट्रिक तंत्रज्ञान. बऱ्याच देशांच्या पासपोर्टमध्ये चिप असते. तिच्यात पासपोर्टधारक व्यक्तीची सर्व माहिती असते. तसेच फोटोमध्ये चेहऱ्याचे सर्व तपशील असतात. दोन डोळ्यांमधील अंतर, नाक, हनुवटी यांच्यातील अंतर आणि चेहऱ्याची रुंदी इत्यादी चेहऱ्यासंबंधीची माहिती सॉफ्टवेअरने चेहरा ओळखण्यासाठी महत्त्वाची असते. ही माहिती चिपमध्ये संकलित केलेली असते. तुम्ही विमानतळाच्या गेटमधून जाता तेव्हा तुमचा चेहरा स्कॅन होतो आणि कॅमेऱ्यात बायोमेट्रिक माहितीचा नकाशा तयार होतो. हे दोन्ही फोटो जेव्हा जुळून येतात तेव्हाच पुढील प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र होता. यात काही बदल जाणवले तर ते नियमात बसत नाही. जर तुम्ही हसत असाल तर तुमच्या चेहऱ्यात फरक पडतो. त्यामुळे बारीक तपशील मिळवणे कठीण जाते.
त्यामुळे पासपोर्टसाठी फोटो काढताना no smile please! ही माहिती कशी वाटली जरूर शेयर करा.
शीतल दरंदळे
