गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर हा फोटो फिरतोय. ज्यात एक डॉक्टर डोक्याला कॅप, तोंडावर मास्क, हातांची घडी आणि कानाजवळ मोबाईल ठेवून जमिनीवरच गाढ झोपलेला दिसत आहे. लोकांनी त्याला आता हिरो बनवलंय. का म्हणजे? अहो, साहेबांनी चक्क २८ तास ड्युटी केलीय.

चिन मधल्या डिंगयुआन शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये टिपलेले हे चित्र आहे. लुओ हेंग नावाच्या या सर्जननं एका रात्रीत २ आणि त्याच्या पुढच्या दिवशी ३ अॉपरेशन्स करून सलग २८ तासांची शिफ्ट पूर्ण केली. त्यामुळे भयंकर थकलेल्या अवस्थेत, आहे त्याच स्थितीत त्यांनी हॉस्पिटलच्या जमिनीवर ताणून दिली. त्यांचे हे फोटो चायनीज सोशल नेटवर्किंग साईट वेइबोवर प्रसिद्ध झालेत. लोकांनी या सर्जनचं कौतुक केलंय, काहीजणांनी घरी बसूनच त्याला अॉनलाईन सॅल्युट ठोकलाय. तर बर्याच जणांनी "डॉक्टरांवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण" या विषयावर व्याख्यानं झाडली आहेत.
