‘अखिल भारतीय काळा ढूस’ संघटने तर्फे अभय भाऊ देओलचे आभार !!!

‘अखिल भारतीय काळा ढूस’ संघटने तर्फे अभय भाऊ देओलचे आभार !!!

अभय देओल जाम पेटलाय राव ! सारुख, दीपिका, जॉन, साहीद, सोनम, विद्या एक्सेट्रा एक्सेट्रा ! अरारारा कोनाला बी नाय सोडला येड्या ! समस्त काळ्या लोकांचा कैवारी आलाय. आता क्रांती होते की नाय बघ !!!

ते टीव्ही वर दाखवणारे क्रीम तोंडावर थोपून काय गोरा होतो का मानुस ?

लेडीज साठी येगळं ? जेन्टस साठी येगळं ?

मायला काळे काळेच राहतात नी गोरे अजून गोरे होतात !!!

अभय आपल्या फिल्लमच्या स्टार्सला बोल्लाय असल्या फांद्यात पडायचं नाय. त्यानं अख्खी लिस्टच काढून एकेकाला कोपचात घेतलंय राव ! काय म्हनतात ते वर्नभेद वगैरेला खात पानी मिळतंय बोल्लाय तो !!!

आता आमाला वर्नभेदातलं काय कळत नाही ओ पन या मुली चिकन्या मुलांच्या पाठीच पाळतात मग आमच्या सारख्या काळ्या मुलांनी जावं कुठं ???

तर मंडली असल्या नाजूक समस्येला हात घातल्या बद्दल अभय भाऊ देओलचे ‘अखिल भारतीय काळा ढूस’ संघटने तर्फे मी आभार मानतो !!!

ये डॉल्बीवाल्या वाजव रे !!!