त्याने नव्याकोऱ्या फोर्ड एंडेवरची गाढवासोबत धिंड का काढली? तुम्हाला हे कारण पटते का?

लिस्टिकल
त्याने नव्याकोऱ्या फोर्ड एंडेवरची गाढवासोबत धिंड का काढली? तुम्हाला हे कारण पटते का?

आजवर एखादी विकत घेतलेली वस्तू खराब निघाली तर जिथून घेतली तिथे जाऊन किंवा इतर कायदेशीर तक्रारी करणारे लोक तुम्ही बघितले असतील. मात्र एका पठ्ठ्याने नवी फोर्ड एंडेवर खराब निघाली म्हणून केलेली युक्ती मात्र भन्नाट आहे.

अर्जुन मीना यांनी २०२० साली फोर्ड एंडेवर खरेदी केली होती. पण या गाडीत काही समस्या उदभवल्याने त्यांनी थेट गाडीची धिंड काढत गाढवामागे गाडी चालवत डीलरच्या शोरूमवर नेली. ते इथवरच थांबले नाहीत, तर त्यांनी सोबत बँड पण लावला होता.

मीना यांना पहिल्यांदा समस्या झाली असे नाही. ते सांगतात की त्यांनी २०१६ साली फोर्ड एंडेवर गाडी विकत घेतली होती. त्या गाडीत समस्या उदभवल्याने त्यांनी पुन्हा २०२० ला नवी कोरी फोर्ड एंडेवर विकत घेतली. पण ही गाडीसुद्धा व्यवस्थित नसल्याने शेवटी कंटाळून त्यांनी हा मार्ग अवलंबला.

त्यांच्या गाडीला ट्रान्समिशनमध्ये अडचण येत आहे. तसेच गाडी कधीही अर्ध्या रस्त्यात बंद पडते. डिलरकडे गाडी घेऊन गेल्यावर ते तात्पुरती सुरू करून देतात परत गाडी जशीच्या तशी होत असल्याने नाईलाजाने त्यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे ते सांगतात.

ही घटना चांगलीच वायरल झाली असली तरी अजून फोर्ड कंपनीने यावर काहीही भाष्य केलेले नाही. अर्जुन मीना यांचे हे वागणे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा.