ब्रेकिंग न्यूज, चर्चासत्र, निवडणुकीची रणभूमी, सिनेमांच्या गप्पा वगैरे वगैरे येण्याआधी बातमी देणाऱ्या वाहिन्या फक्त बातमी देण्याचं काम करत होत्या. आता बातम्या देणाऱ्या वाहिन्याच मनोरंजन करू लागल्या आहेत. आपल्यातल्या अनेकांना आठवत असेल की एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र जमून दूरदर्शनवर बातम्या पाहत असे आणि ही एक वेळ हमखास ठरलेली असायची.
तो जमाना निघून गेला, पण त्या आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत दूरदर्शनवर बातम्या देणारी काही मंडळी, ज्यांनी आपलं दूरदर्शन व्यापून टाकलं होतं.







