तुम्ही रेल्वे च्या प्रवासात कधी टोमॅटो सूप प्यायले आहे का? हा प्रकार वाचून तुम्ही नक्कीच पुढच्या वेळी सूप पिण्याच्या आधी दोनदा विचार कराल
रविवारी एर्नाकुलम- कोलकत्ता दुरान्तो एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पँट्री स्टाफला टॉयलेटमधले पाणी वापरून सूप तयार करताना पाहिले. होय, तुम्ही बरोबर वाचता आहात. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये साखळीने बांधलेलं पाणी तुम्ही जेवणाच्या टेबलवर आणणे जेवढं किळसवाणे आहे तसाच हा प्रकार आहे.
या प्रकाराबद्दल कोझीकोड स्टेशनमास्तरांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. संतप्त प्रवाशांनी गाडी 15 मिनिटे थांबवून ठेवली होती. स्टेशनमास्तरांनी संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची हमी दिल्यानंतर गाडी पुढे सोडण्यात आली.
