मोबाईलमध्ये सोनं पण असतं हे ऐकून (किंवा आत्ताच वाचून) आपल्यापैकी बर्याच जणांनी कान टवकारले आणि डोळे विस्फारले असतील. तसंही बर्याच कंपन्या या स्क्रॅप मोबाईल्स मधून सोनं काढायचं काम करतात. पण हे सोनं काढण्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती बरीच हानीकारक आहे. कारण त्यात सायनाईड आणि पाऱ्यासारखी घातक रसायनं वापरली जातात. (कदाचित म्हणूनच आपल्यातले बरेच जण शांत बसलेत)
पण गुड न्युज ही आहे की, हे सोनं काढायची नवी आणि सोपी पद्धत शोधलीय युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग च्या शास्त्रज्ञांनी या नव्या प्रक्रियेत एका सौम्य अॅसीडमध्ये मोबाईलचा सर्किट बोर्ड ठेवला जातो ज्यामुळे बोर्डमधील सगळे धातु पाघळतील. आणि त्यानंतर त्यात एक केमिकल कंपाऊंड असणारा तरल पदार्थ मिसळला जातो जो फक्त सोनं वेगळं करतो !
आता जपान सरकार पण मोबाईल मधून सोनं काढायची तयारी करतंय म्हणे... कारण 2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो अॉलिंपिक्स मध्ये मेडल्स तयार करण्यासाठी ते हेच सोनं वापरणार आहेत ! आतापर्यंत या लोकांनी अशा इलेक्ट्रॉनिक भंगारामधून 1564 किलोग्रॅम चांदी गोळा केलीय तज्ञांच्या मते जगभरात तयार होणारा हा इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करून दरवर्षी 300 टन सोनं वाचवता येऊ शकतं. आता तुम्हीच विचार करा... जुना माल फेकायचा ? की.... साठवायचा ?
