तुम्ही instragram वर आहात? ट्रेन च्या खिडकीतून काढलेले हे फोटो पाहिलेत का?

तुम्ही instragram वर आहात? ट्रेन च्या खिडकीतून काढलेले हे फोटो पाहिलेत का?

1853 च्या पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या रेल्वे चा प्रवास हा एक वेगळाच अनुभव आहे, विविध प्रकारचे लोक, काही किमी अंतरावर बदलणारी संस्कृती या सोबतच नैसर्गिक सौंदर्य या मुळे हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय ठरतो. या आणि अशाच अनुभवांचे कलेक्शन इन्स्टाग्राम वर करतंय विंडो सीट प्रोजेक्ट.

शानू बाबर व त्याच्या मित्रांनी पुण्याच्या सिम्बॉयोसिस इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन मध्ये शेवटच्या वर्षात या प्रोजेक्टची सुरवात केली. सुरवातीला त्यांच्या प्रवासातील अनुभवांचे फोटो आणि व्हिडीओ येथे होते. पुढे त्यांनी क्राऊड सोर्सिंग ला सुरवात केली आणि येथे कलेक्शन वाढत गेले. आज या प्रोजेक्टचे 14000 फॉलोवर्स आहेत. तर आपणही पाहुयात यातले काही फोटोज