कर्ज काढताय ? आधी फेसबुक मित्रांची यादी चाळून बघा !!!
कर्जासाठी अर्ज केल्यावर अर्जदाराचे पतमानांकन सिबील सारख्या संस्थे मार्फ़त तपासण्याची सोय गेली बरीच वर्षे उपलब्ध आहे. किंबहुना पत मानांकन (credit rating)750 पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळण मुश्कील असते. पण ज्यांनी आतापर्यंत कर्ज घेतले नाही त्यांचे मानांकन कळणे दुरापास्त असते.
गेल्या काही दिवसात एक दुय्यम प्रणाली काही वित्त संस्थांनी वापरायला सुरुवात केली आहे. यासाठी अर्जदाराला येणारे एसएमएस - इ मेल्स- अर्जदाराची फेसबुक आणि इतर सोशल मिडियावरची वर्तणूक वगैरेंचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्थातच हे सगळे करण्यासाठी अर्जदाराची आगाऊ संमती घेतली जाते. पण अर्जदारानो सावधान !!
तुमच्या फेसबुकवराच्या मित्रांपैकी तीन पेक्षा जास्त मित्रांची नावे कर्ज बुडवणारांच्या यादीत असतील तर तुमचा कर्जाचा अर्ज फ़ेटाळला जाईल.
