साधारण तीन एक महिन्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या नेटफ्लिक्स या अमेरिकन टीव्ही सिरीजने आपली पहिली भारतीय ओरिजिनल वेब सिरीज जाहीर केली आहे. अनुराग कश्यपच्या फॅंटम फिल्म्स च्या सहकार्याने ही मालिका प्रोड्यूस केली जाणार आहे.
नेटफ्लिक्स ओरिजिनल या नावाने नेटफ्लिक वेब सिरीज प्रोड्युस करते आणि त्यांनी हाऊस ऑफ कार्डस, ऑरेंज इस न्यू ब्लॅक, नार्कोस या आपल्या वेब सिरीज द्वारा मोठ-मोठ्या टीव्ही नेटवर्क्सला टक्कर दिली आहे. उत्तम कथानक आणि चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू या नेटफ्लिक्सच्या जमेच्या बाजू.
भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड हार्टस या कादंबरीवर आधारीत ही सिरीज असणार आहे. मुंबई शहरात असलेले अंडरवर्ल्ड, करप्शन, राजकारण हा या कादंबरीचा गाभा आहे.
नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन जरी आपल्या पायरसी प्रेमी जनतेला महाग वाटत असले तरीही त्यांचा हा प्रयोग यशस्वी व्हावा ही आमची इच्छा आहे. त्यामुळेच कदाचित आपल्याला सास बहू टाईप शोजपासून मुक्ती मिळू शकेल.



