फेसबुकवर अचानक ही जांभळ्या फुलाची रिअॅक्शन कशासाठी आली भाऊ ?

फेसबुकवर अचानक ही जांभळ्या फुलाची रिअॅक्शन कशासाठी आली भाऊ ?

भाऊ काल मोबाईलवर फेसबुक उघडला आणि सरप्राईज झालो ना, आपल्या झुक्याने नवीन ‘जांभळ्या फुलवाला’ इमोजी आणलाय फेसबुकवर. च्यायला म्हटलं हा काय प्रकार हाय. त्या इमोजीवर क्लिक केला तर समजला हे फुल तर ‘थँकफुल’ आहे ! नंतर आपल्या पिशीवर फेसबुक उघडला तर तिथ ग्रेटफुल दाखवलं. आयला म्हटलं हा काय लोचा हाय. एक ठिकाणी थँकफुल आणि दुसऱ्या ठिकाणी ग्रेटफुल. एक काय ते फुल ठेवाना.

हा कम्फ्युजन बघून मी गुगल केल्यावर समजला, हा इमोजी काय पर्मनंट नाय. हा इमोजी तात्पुरता हाय आणि ‘मदर्स डे’ साठी स्पेशली आणलाय आपल्या झुकेर्बर्गनं. आता तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली असलं कि हे ग्रेटफुल आणि थँकफुल मागं काय भानगड हाय. आपल्या आईला ‘मदर्स डे’ साठी आपण हे पर्पल फुल देऊन शुभेच्छा देऊ शकतो. किती विचार करतात ना हे फेसबुकवाले आपला !!!

काही लेजेंड्री मंडळीनी तर हे फुल आपल्या गर्लफ्रेंडच्या फोटोला देऊन टाकलं. काहींनी तर हद्दच केली, माणूस मेला म्हणून श्रद्धांजलीसाठी या फुलाचा वापर केला...आता बोला !!!

 

(माहिती स्त्रोत ‘दि इकॉनॉमीक टाईम्स’)