फेसबुक हे सोशल मीडिया अन्न वस्त्र निवारासारखेच जीवनावश्यक म्हणावे इतके महत्वाचे झाले आहे. रोजचे कित्येक तास आपण फेसबुकवर असतो. फेसबुक मेसेंजर हा गप्पा मारण्याचे मोठे साधन आहे. पण इथे मोकळ्या गप्पा मारायला कधीकधी मर्यादा येतात. कारण समोरची व्यक्ती कोणत्या गोष्टींचा स्क्रीनशॉट काढून घेईल सांगता येत नाही. या गोष्टीवर आता फेसबुक भन्नाट उपाय घेऊन आले आहे.
फेसबुक/ मेटाचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने नुकतीच यासंबंधी घोषणा फेसबुकवर केली आहे. एन्ड टू एन्ड इनक्रिप्टेड चॅट सुरू असताना जर मध्येच एखाद्याने स्क्रीनशॉट घेतला तर या गोष्टीची माहिती समोरच्या व्यक्तीला होणार आहे. तसे स्पष्ट नोटिफिकेशन समोरच्याला जाणार आहे.
याचबरोबर मेसेंजरमध्ये शेअर केला जाणारा मीडिया पण सेव्ह करता येणार आहे. याचबरोबर डीसअपियर होणाऱ्या मेसेजेसचा जर समोरच्याने स्क्रीनशॉट काढला तर तोही समजणार आहे. व्हाटस्ॲपमध्ये काही काळानंतर मेसेजेस गायब होता, फेसबुक मेसेंजरमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. अशा गायब होऊ शकणाऱ्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतला जाण्याची शक्यता अधिक असते. तो घेतला तरी तो संदेश पाठवणाऱ्याला याची माहिती मिळेल.
मेसेजवर रिऍक्शन, स्टिकर, जीआएएफ, तसेच स्पेसिफिक मेसेजेस ना रिप्लाय असेही फीचर्स आता लोकांना उपलब्ध असतील. लोकांना प्रायव्हसीबरोबर चॅटिंगचा आनंद घेता यावा म्हणून नवनवीन फीचर्स झुकरदादा लॉन्च करत आहेत.
इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या मेटाच्याच मालकीच्या माध्यमांवर पण नवे फीचर्स येत आहेत.
उदय पाटील
