आता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज!! कसा ? वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती

लिस्टिकल
आता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज!! कसा ? वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती

फेसबुक आता नवीन फिचर लाँच करत आहे. ज्याद्वारे तुम्हाला चक्क फेसबुकवरून मोबाईल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन आहे का ? असेल तर मग लवकरच प्लेस्टोरवर फेसबुक अॅपचं नवीन व्हर्जन येणार आहे. ते एकदा डाऊनलोड केलं की तुम्हाला फेसबुकवरून मोबाईल रिचार्ज करता येईल. पण तुमच्याकडे आयफोन असेल तर मात्र तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. कारण आयफोनवर हे फिचर यायला थोडा उशीर होईल भौ.

मंडळी आता पाहूयात या नवीन फेसबुक अॅपद्वारे मोबाईल रिचार्ज कसा करायचा ते...एकदम ष्टेप बाय ष्टेप... !!

१. नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुमच्या फेसबुक अॅपवर तुम्हाला हॅम्बर्गर असलेला आयकॉन दिसेल किंवा Top-Up नावाचा पर्याय दिसेल.

१. नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुमच्या फेसबुक अॅपवर तुम्हाला हॅम्बर्गर असलेला आयकॉन दिसेल किंवा Top-Up नावाचा पर्याय दिसेल.

२. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसाठी पर्याय विचारले जातील.

३. डेबिट किंवा क्रेडीट कार्डपैकी एक पर्याय निवडा.

४. रिचार्जसाठी असलेला Recharge Now पर्याय निवडा.

४. रिचार्जसाठी असलेला Recharge Now पर्याय निवडा.

५. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल.

६. नंबर भरून झाला की तुमच्या नंबर वरून फेसबुक तुमचा सर्व्हिस प्रोवायडर ओळखेल किंवा तुम्हाला स्वतः सर्व्हिस प्रोवायडर निवडावा लागेल.

६. नंबर भरून झाला की तुमच्या नंबर वरून फेसबुक तुमचा सर्व्हिस प्रोवायडर ओळखेल किंवा तुम्हाला स्वतः सर्व्हिस प्रोवायडर निवडावा लागेल.

उदाहरणार्थ, आयडिया, वोडाफोन, एअरटेल, इत्यादी इत्यादी.

७. त्यानंतर किती रुपयांचा रिचार्ज करायचा आहे ते निवडा किंवा तुमच्या चॉईसने उपलब्ध असलेला पॅक निवडा.

७. त्यानंतर किती रुपयांचा रिचार्ज करायचा आहे ते निवडा किंवा तुमच्या चॉईसने उपलब्ध असलेला पॅक निवडा.

८. पुढचा टप्पा असेल पेमेंटचा. डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्डचा तपशील भरून पेमेंट करा.

९. शेवटी Place Order वर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलची घंटी वाजंल आणि तिथे तुमचे पैसे आलेले असतील.

मंडळी, एक लक्षात राहूद्या, फेसबुकवरून रिचार्ज करताना फक्त डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरता येणार आहे. इतर मार्गाने पेमेंट करता येणार नाही. आणि हो तुमच्या माहितीसाठी सांगतो. थोड्याच दिवसात तुमच्या कॉम्पुटरपण हा फिचर येणार आहे.

आणखी वाचा :

नवं पॅनकार्ड बनवा, जुन्यामधली माहिती अपडेट करा आणि तेही घरबसल्या !!