आता एका माणसाकडे दोन-दोन मोबाईल्स असतात. पण एक काळ होता जेव्हा घरामध्ये एक टेलिफोन पण असणं शक्य नव्हतं. तेव्हा सगळेजण एकमेकांना ख्यालीखुशाली कळवायला पत्र लिहायचे. पंधरा पैशांची पोस्टकार्डं, पंचाहत्तर पैशांचं निळं आंतरदेशीय पत्र, उलट ट्पाली उत्तर हवं असेल तर आपला पत्ता लिहिलेलं जोडपत्र आणि पाकिट पाठवायचं झालं तर मग तिकिटं!! त्यातही अर्धं लिहिलेलं पत्र म्हणजे अपशकुन मानायाचे म्हणून लिहायला काही नसेल तरी काहीतरी लिहून रिकामी जागा भरली जायची. कुणी गेल्याचं कळवताना मात्र मजकूर एकाच बाजूला लिहून अर्धवट टाकण्याचीही पद्धत होती.
आता पत्र पाठवण्याची तितकी पद्धत राहिली नाही. पण काळाबरोबर नवीन सेवा पुरवत भारतीय पोस्ट ऑफिस ही जुनी सेवा अजून चालू आहे. आज बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे या टपाल खात्याविषयी लोकांना अधिक माहित नसलेल्या गोष्टी. आमची खात्री आहे यातली सहावी आणि सातवी गोष्ट तुम्हाला आजवर नक्कीच माहित नसेल..









