भारत पाक दरम्यान झालेल्या सामन्यात चतुर कॅमेऱ्यांनी विजय मल्याला रंगे हात पकडलं आणि त्यानंतर सोशल मिडीयावर माणसांनी त्याला नको नको ते बोल्ल पण या माणसाची चिकाटी बघा एवढं होऊन सुद्धा मल्या कालच्या भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला हजर राहिला. म्हणजे हाय की नाही हा माणूस हत्तीच्या चामड्याचा ?
आता या मॅचला जमलेले आपले भारतीय प्रेक्षकांना जेव्हा विजय मल्या स्टेडीयमच्या बाहेर दिसला तेव्हा त्यांना कंट्रोलचं झालं नाही आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. ‘चोर, चोर, चोर’. यावेळी त्याला भारतात आल्याचा फील नक्कीच आला असेल राव. एवढं होऊन सुद्धा मल्या साहेब काहीही न बोलता, शांतपणे सामना बघायला स्टेडीयम मध्ये निघून गेले.
घरच्या जावईगत वागणाऱ्या या माणसाचं काय करावं तेच कळना झालंय बघा !!!
#VijayMallya is at the satidum... And he receives an India style boo boos... #INDvSA pic.twitter.com/k3xOOhDnZr
— Kuchipudi Bobby (@kuchipudibobby) June 11, 2017
