तुम्ही लठ्ठ की सडपातळ हे ठरवणाऱ्या 'बॉडी मास इंडेक्स'बद्दल जाणून घ्या !!

तुम्ही लठ्ठ की सडपातळ हे ठरवणाऱ्या 'बॉडी मास इंडेक्स'बद्दल जाणून घ्या !!

बदलत्या जीवनमानात  वाढत जाणारं वजन ही सध्याची मोठी समस्या होते आहे. वाढणार्‍या वजनाचे दुष्परिणाम ताबडतोब लक्षात येत नाहीत. जेव्हा जिना चढल्यावर दम लागणे, गुडघ्यातून कळा येणे किवा एखाद्या रविवारी सोसायटीच्या क्रिकेटमध्ये एक ओव्हर टाकल्यावर दमछाक होणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु झाल्या, की मग  वाढत्या वजनाची जाणीव होते. आपसूक आपण व्यायामाकडे वळतो, खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतो. पण वजन नक्की किती असावं हे ठरवण्याचा मापदंड फारसा कोणाला परिचयाचा नसतो. म्हणून आज आपण बॉडी मास इंडेक्स (BMI) चा परीचय करून घेणार आहोत.

बॉडी मास इंडेक्स (BMI) चं सोपे सूत्र असं आहे पाहा.. वजन भागिले उंचीचा वर्ग. इथं वजन किलोत मोजायचं आहे तर उंची मीटरमध्ये. या भागाकाराचं जे उत्तर येईल तो तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI). उदाहरणार्थ , तुमचं वजन ७४ किलो आहे आणि उंची ५ फूट १० इंच (म्हणजे १.७७ मीटर) आहे. तर गणित करायचं-  ७४ भागिले १.७७ चा वर्ग.  उत्तर येतं २३.६२ . हा झाला तुमचा BMI. 
या उत्तराचा उपयोग कसा  करायचा ते आपण बघू या !

BMI = १८ पेक्षा कमी म्हणजे तुम्हाला वजन वाढवण्याची आवश्यकता आहे.
BMI= १८ पेक्षा जास्त पण २५ च्या वर नाही म्हणजे तुमचं वजन योग्य आहे आणि ते इतकंच रहावे अशी काळजी घ्यावी लागेल.
BMI = २५ पेक्षा जास्त  पण ३० च्या वर नाही. म्हणजे तुमचा  अतिरिक्त  वजन गटात समावेश होतो. वजन कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील.
BMI= ३० पेक्षा जास्त पण ३५ पेक्षा कमी.  हा आहे स्थूल गट.  डाएटिशिअन आणि जीमची ताबडतोब आवश्यकता आहे.
BMI= ३५ पेक्षा जास्त. धोकादायक स्थूल गटात समावेश . वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं  आवश्यक आहे. 

जर तुमचा BMI  जास्त असेल तर आजच वजन कमी करण्याचा संकल्प करा. तुमचा उत्साह वाढावा म्हणून तुमच्या काही आवडत्या नायिकांचे/नायकांचे BMI  किती आहेत, त्याचे आकडे आम्ही देतो आहोत.

ऐश्वर्या राय - वजन ५७ किलो- उंची १७० सेंटीमीटर -  BMI १९.७२ 
अनुष्का शर्मा -वजन  ५४ किलो -उंची १७५ सेंटीमीटर- BMI – १७.६३
कतरिना कैफ -वजन ५९- किलो उंची १७२ सेंटीमीटर -BMI -१९.९४
दिपिका पदुकोण- ६० किलो- उंची १७४ सेंटीमीटर - BMI - १९.८१
प्रियांका चोप्रा - वजन ६०किलो- उंची १६९सेंटीमीटर - BMI-२१.००
श्रद्धा कपूर -वजन ५२किलो -उंची  १६५ सेंटीमीटर-   BMI-१९.८१
आलीया भट्ट- वजन ५४ किलो -उंची -१७० सेंटीमीटर - BMI-१८.६८
सनी लिओने - वजन ५४ किलो- उंची १६३ सेंटीमीटर- BMI – २०.३२