पिकाला दृष्ट लागू नये म्हणून या माणसाने काय भन्नाट उपाय केलाय पाहा!

पिकाला दृष्ट लागू नये म्हणून या माणसाने काय भन्नाट उपाय केलाय पाहा!

नजर लागू नये म्हणून लोक लिंबू मिरची बांधतात पण ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्याने चक्क सनी लिओनीचा फोटो वापरलाय राव. सनी लिओनीचा लाल बिकिनी मधला फोटो त्याने बुजगावण्यासारखा वापरलाय आणि त्यावर लिहिलंय, “माझ्यावर जळू नका’”

मंडळी, ए. चेंचू रेड्डी हे आंध्रप्रदेश मध्ये राहतात. त्यांना काही वर्ष शेतीत नुकसान सोसावं लागत होतं. पण यावर्षी त्यांच्या १० एकर जमिनीत चांगलं पिक आलं आहे. या चांगल्या पिकामुळे त्यांची शेती तर बहरली पण अनेकजणांच्या नजरा त्यांच्या शेतीवर खिळल्या. या नजरांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी चक्क सनी बाईंचा फोटो शेतात लावला.

स्रोत

या मागचं कारण विचारल्यावर रेड्डी म्हणाले की ‘सनी लिओनीचा फोटो लावल्यामुळे लोकांची नजर माझ्या शेतीवर न जाता सनी लिओनीच्या फोटोवर जाईल. त्यामुळे माझ्या शेतीला वाईट नजर लागणार नाही.’ आणखी सांगताना रेड्डी म्हणाले की, ‘माझ्या शेताजवळून जाताना प्रत्येकजण माझ्या शेतीला न बघता सनीच्या फोटोला बघतो त्यामुळे मला याचा फायदाच झाला आहे.’

हे बघून ‘भारतात काहीही होऊ शकतं’ या गोष्टीवर आज विश्वास बसला राव.

 

आणखी वाचा :

सनी लियोन बनली आई : कुठे कौतुक, तर कुठे नाराजीचा सूर...

मी 'सही पकडे है' म्हणाले तर लोक काय म्हणतील ? सनी लियोनला वाटली भीती