मंडळी, आजवर तुम्ही माणसांनी पैसे खाल्ल्याचे ऐकले असेल. पण आता शेळ्याही पैसे खायला लागल्या आहेत. जर तुम्ही त्यांना खायला नाही दिले तर अजून काय होणार ना? खाल्ल्या नोटा. हा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशात.
सर्वेश कुमार पाल यांनी आपल्या पायजम्याच्या खिशात २०००च्या ३३ नोटा म्हणजे ६६,००० रुपये ठेवले होते. बांधकामासाठी विटा घेण्यासाठी त्यानं पैसे काढले होते. आपला पायजमा काढून तो बाथरूम मध्ये गेला. तो तिथून बाहेर येईपर्यंत त्याच्या शेळीने ३१ नोटा खाऊन टाकल्या होत्या. त्याच्याकडे उरल्या फक्त २ च नोटा, पण त्यासुदधा फाटक्यातुटक्या...
या भाऊंना आपल्या जनावरांना योग्य वेळी आणि पोटभर खायला द्यावं हे ६६,००० रूपये खर्चून कळालं..
