५ सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासातला आणखी एक काळा दिवस ठरला. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.. गौरी लँकेशा यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांच्याच बंगळूरूमधल्या घराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
मंडळी, असे भ्याडपणे गोळ्या झाडून माणसाचं तोंड बंद करणे हे काही नवीन नाही. विरोधात बोलणाऱ्यांची या आधीसुद्धा अनेकदा हत्या झाली आहे. फक्त यात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे "गौरी लंकेश".
तर आज आपण बघणार आहोत अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेले पत्रकार आणि विचारवंत...







