मोबाईलमध्ये ब्राउझर म्हणून पहिला मान मिळतो तो ‘गुगल’ क्रोम’ला. मग येतात ‘यु.सि. ब्राउझर’, ‘फायरफॉक्स’, किंवा ‘ऑपेरा’. नेट सर्फिंग करताना गुगल क्रोमची कुणी बरोबरी करू शकत नाही. कारण इतर ब्राउझर्सपेक्षा गुगल क्रोम खूपच फास्ट आहे. अशावेळी इतर ब्राउझर लोकांच्या लक्षातही येत नाहीत.
गुगल क्रोमच्या वाढत्या प्रभावाला बघता फायरफॉक्सने आता कंबर कसली आहे. ‘फायरफॉक्स क्वान्टम’ हा ब्राउझर क्रोमपेक्षा कित्येक पटीने फास्ट असल्याचा दावा केला जातोय. शिवाय गुगल क्रोमपेक्षा फायरफॉक्स क्वान्टम कमी मेमरी खातो.
फायरफॉक्स क्वान्टम खरच किती स्मार्ट काम करतो हे बघण्यासाठी एक टेस्ट देखील घेण्यात आली होती. या टेस्टची व्हिडीओ क्लिप आपण खाली बघू शकता.
.
मंडळी, गुगल क्रोम हा गुगल आणि युट्युब खूपच जलद ‘लोड’ करतो. पण इतर वेबसाईट्स लोड करताना त्याची दमछाक होते. हेच हेरलंय फायरफॉक्स क्वान्टम ब्राउझरने. या टेस्टमध्ये आपण बघू शकतो की फायरफॉक्स क्रोमपेक्षा दुप्पट वेगाने काम करत आहे. तसेच टेस्टमध्ये दिसून आलंय की क्रोमपेक्षा ३०% मेमरी कमी वापरली जाते.
मंडळी हवी ती माहिती ‘शून्य सेकंदात’ हवी असेल, तर एकदा ‘फायरफॉक्स क्वान्टम’ ला संधी देऊन बघायला हरकत नाही.
