दिनविशेष : श्री गजानन महाराज प्रकट दिन

दिनविशेष : श्री गजानन महाराज प्रकट दिन

   महाराष्ट्र म्हणजे संत-महंतांचे माहेरघर. जढमुढांच्या कल्याणासाठी इथे अनेक थोर विभुतींनी आपले आयुष्य झिजविलं. त्यातलीच एक असामान्य संतविभूती म्हणजे शेगांवचे श्री गजानन महाराज. आज त्यांचा प्रकटदिन सर्वत्र भक्तीभावात साजरा होतोय.

                उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खाताना महाराज वर्‍हाडातल्या शेगांव गावात सर्वप्रथम २३ फेब्रुवारी १८७८ रोजी दिसले. आपल्या विविध लीलांनी लोकांच्यात त्यांच्याविषयी अगम्य श्रद्धा निर्माण केली आणि त्याची कल्पना आजही त्यांचा प्रचंड भक्त परिवार पाहून येऊ शकते. विशेष म्हणजे इथे श्रध्देचा महापूर असला तरी इतरत्र आढळणार्‍या अंधश्रध्देचा लवलेशही दिसत नाही. 

  

                    महाराजांचा एक दुर्मिळ फोटो

 

महाराजांचा एक दुर्मिळ फोटो

 

            महाराजांच्या समाधीनंतर सुरू झालेलं श्री गजानन महाराज संस्थान  देशविदेशात नावाजलं जातं ते त्यांच्या स्वच्छ, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजसेवी प्रकल्पांमुळे. संस्थानद्वारे चालवण्यात येणारी विविध कॉलेज, हॉस्पिटल्स, आरोग्य शिबीरे, आदिवासी आणि दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्रे हे सारंच काही कौतुकास्पद वाटतं. शेगांव मध्येच निर्माण झालेला भव्य आनंदसागर प्रकल्प तर तुमचे डोळे दिपवण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. जर तुम्हाला शिस्त, अध्यात्म, स्वच्छता, भव्यता आणि पारदर्शकता हे सारं काही एकाच ठिकाणी अनुवायचं असेल तर एकदा शेगांवला नक्कीच भेट द्या. 

 

           मनमोहक आनंदसागर प्रकल्प

मनमोहक आनंद सागर प्रकल्प