मुख्यमंत्र्यांच्या सभेला पुणेकरांची पाठ...सोशल मिडीयावर टोमण्यांचा पाऊस!!!

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पुणेकरांची पाठ...सोशल मिडीयावर टोमण्यांचा पाऊस!!!

निवडणुकीचा प्रचार जोरात चालू असताना सर्वच नेत्यांच्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पण याउलट चित्र मुख्यमंत्र्यांच्या सभेला पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या सभेला पुणेकरांनी सपशेल पाठ फिरवलेली होती.

सदाशिव पेठेतल्या टिळक रोडवर आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.  सभेची वेळ होऊन गेली तरी तुरळक लोकांनाच सभेला आलेलं बघून मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द केली आणि पिंपरी चिंचवडकडे प्रयाण केले. ट्विटरवर मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आणि दिलगिरी व्यक्त केली. पण बातमी अशी आहे की लोक येण्याची वाट बघत मुख्यमंत्री १५ मिनिटे स्टेजखाली ताटकळत उभे होते.

पुण्यातला हा प्रकार पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित करतो ते म्हणजे दुपारी पुणेकर आणि पुणे दोन्ही बंद असतात. आता पुणेकरांच्या विश्रांतीच्या वेळेस कोणी सभा ठेवली तर पुणेकर कसे जातील? मुख्यमंत्री असले म्हणून काय झाले? हे आम्ही म्हणत नाहीये. या प्रकारानंतर अश्या पुणेरी टोमण्यांनी सोशल मिडिया ओसंडून वाहत आहे. तुम्हाला यातला कोणता जोक आला? पाहा बरं.

 

१.

अब की बार

कुणाचेही सरकार

इथे दुपारी झोपतो मतदार.

नवीन पुणेरी पाटी ???

 

 

२. मुख्यमंत्री म्हणतात – सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या  ???

 

 

३. मुख्यमंत्र्यांच्या सभेला ‘पारदर्शक’ गर्दी !

 

 

४. पुण्यात, तेही सदाशिव पेठेत, दुपारी  १ ते ४ मध्ये सभा? कल्पनाच करवत नाही. याला म्हणतात ‘हात दाखवून अवलक्षण’. एक तर ते पुणं, त्यात सदाशिव पेठ, टिळक रोड आणि वर दुपारी तीन वाजता! ही मुभा तर पेशव्यांनाही नाही!!!

 

 

५. मुख्यमंत्र्यांची दुपारी एकची सभा रद्द... कोणीही जमलं नाही सभेला...अरे, १ ते ४ पुणे बंद असतं.. मग तिकडे मुख्यमंत्रीही असो... पुणेरी बाणा शेवटी तो.. याला म्हणतात नियम तो नियम...

 

 

६. तरी बरं मुख्यमंत्री सभाच घ्यायला गेले... चितळेंकडे बाकरवडी घ्यायला गेले नाहीत!!!