११ रुपये भरा आणि पापमुक्तीचे सर्टिफिकेट मिळवा!!!

११ रुपये भरा आणि पापमुक्तीचे सर्टिफिकेट मिळवा!!!

तुम्ही आयुष्यात पाप केले नाहीत असे तर होऊ शकत नाही. आजवर गंगेत बुडी मारून पाप धुवून टाकण्याचा एकच उपाय आपल्याला माहीत होता. पण तुम्हाला पाप मिटल्याचा सर्टिफिकेट काही मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जावे लागेल राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या "गौतमेश्वर महादेव पापमोचन तीर्थ" या ठिकाणी. या शिवमंदिरात अगदी सहीशिक्यासहित पापमुक्तीचे सर्टिफिकेट मिळते.

हे सर्टिफिकेट मिळवणे सोपे आहे. या मंदिरात मंदाकिनी नावाचे एक कुंड आहे, त्या कुंडाच्या आसपास तुम्हाला पुजारी दिसतीलच. कुंडात डुबकी मारायची फी 10 रुपये भरा, त्यात एक रुपया सर्टिफिकेटाचा मिळवा आणि झाले काम. आजुबाजूच्या गावातले अनेक लोक इथे पापमुक्तीसाठी येत असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आलेल्या सर्व लोकांचे रेकॉर्ड मंदिरात उपलब्ध आहे. तर मग मंडळी कधी जाताय तुम्ही हे सर्टफिकेट मिळवायला?