सांगलीचा तेजस लेंगरे बनला शेळीपालनाद्वारे यशस्वी उद्योजक

सांगलीचा तेजस लेंगरे बनला शेळीपालनाद्वारे यशस्वी उद्योजक

सांगली जिल्हा तसा हिरवागार. पण गेल्या काही वर्षांत तिकडेही दुष्काळाने लोकांना शेतीवरतीच अवलंबून न राहता इतर मार्ग धुंडाळायला लावले आहेत. तेजस लेंगरे हा सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातला युवक. घरची फक्त दोन एकर शेती आणि दहावीपर्यंतचं शिक्षण या त्याच्यासमोरच्या मोठ्या अडचणी होत्या. पण त्याला शेळीपालनाचा मार्ग सुचला. 

घरच्या ६-७ शेळ्यांना जोड म्हणून त्याने आफ्रिकन बोअर जातीच्या नर-मादीची जोडी आणली आणि घरच्या शेळ्यांचा संकर केला. फक्त माद्या घरी ठेवून नर विकले आणि त्याच्याकडच्या शेळ्यांची संख्या आता १२५पर्यंत येऊन ठेपलीय. आधुनिकतेची जोड देत तेजसने शेळ्यांसाठी  खास  गव्हाणी बांधल्या आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून शेळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवलंय. आता उपल्ब्ध दोन एकरांमध्ये मका आणि हत्तीगवताची पैदास करून तो शेळ्यांच्या चार्‍याचंही योग्य व्यवस्थापन करत आहे. 

होता होता त्याच्या या  व्यवसायाची वार्षिक उलाढाल  २० लाखांवर येऊन ठेपलीय. म्हणतात ना,  करणार्‍याचं सगळं भलं होतं, न करणारा नुसताच हातावर हात धरून बसून राहतो. बोभाटा टीमतर्फे तेजसला त्याच्या व्यवसायासाठी भरघोस शुभेच्छा!!